To Reach The People & Community!
 दिनविशेष

 नागपूर

नागपुरात मुसळधार पावसाचं थैमान; नाग नदीवरील पूल खचला

THE XYE   23-09-2023 13:52:52   89

 नागपुरात मुसळधार पावसाचं थैमान;

 नाग नदीवरील पूल खचला

 

नागपूर ( प्रतिनिधी ) : नागपुरात शुक्रवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने नागपुरकरांचे जनजीवन विस्कळीत केले आहे. नागपुरातील पंचशील चौक ते झाशी राणी चौकात नाग नदीवरील पूल कोसळल्याची घटनादेखील या मुसळधार पावसाने घडली आहे. नागपुरातील नाग नदीला पूर आल्याने तसेच नाग नदीवरील पूल कोसळल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. या पूलावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. तर हा रहदारीचा रस्ता असल्याने आता वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. नागपूर शहरात काल सुरू झालेला पाऊस हा सकाळी साडेपाच वाजेपर्यंत १०६.७ मिमी इतका झाल्याची नोंद हवामान विभागाकडून करण्यात आली आहे. तर मोरभवन येथे असलेले बस स्थानक चार ते पाच फुटांपर्यंत पाण्याखाली गेले आहे. तर गांधी नगर येथील शासकीय मुलींच्या वसतीगृहातही पाणी शिरलं आहे. मनपाच्या अग्निशमन विभागाने ५० मुलींचं रेस्क्यू ॲापरेशन केलं असून मुलींना रेस्क्यू करुन इतर ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलंय.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती