To Reach The People & Community!
 दिनविशेष

 कोल्हापूर

कोल्हापूर शहरात परतीच्या पावसाने लावली दमदार हजेरी

THE XYE   05-10-2023 13:12:29   96

कोल्हापूर शहरात परतीच्या पावसाने लावली दमदार हजेरी 

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून दमदार परतीच्या पावसाने हजेरी लावली आहे. कोल्हापूर शहरातील कसबा बावडा, शिये परिसराला ढगफुटीसदृश पावसाने तडाखा  दिला. कोल्हापूर शहर, गांधीनगर परिसरातही मुसळधार पावसाने हजेरी लावली. बुधवारी सायंकाळी शिये, कसबा बावडा परिसरात अचानक ढगफुटीसदृश पाऊस सुरु झाला. त्यामुळे सर्वत्र काहीच वेळात पाणीच पाणी झाले. शिये गावात छत्रपती शिवाजी महाराज चौकातही पाणी जोरदार वाहू लागले. स्टेट बँकेच्या शाखेतही पाणी साचले. पावसाळ्यात जेवढे पाणी आले नाही ते केवळ तासाभराच्या पावसात आल्याने ग्रामस्थांची धावपळ उडाली. 

    शाहूवाडी तालुक्यातील बर्की येथील कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्याचा पिलर कोसळल्याने मार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. बर्की फाटा ते बर्की गावाला जोडणाऱ्या या बंधाऱ्यावरून बर्की, बुराणवाडी, कोटकरवाडी या गावांतून वाहतूक होते. बर्की धबधब्याकडे भेट देणारे पर्यटक याच मार्गावरून येतात. काही दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसाने कासारी नदी दुथडी भरून वाहिली व पाण्याचा जोर वाढल्याने या बंधाऱ्याचा पिलर वाहून गेला आहे. त्यामुळे या बंधाऱ्यावरून वाहतूक धोकादायक आहे. पादचारी व दुचाकी वाहतूक सुरू आहे. त्यामुळे बर्की ग्रामस्थ व पर्यटकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे

  दुसरीकडे, मंगळवारी पावसाचे आगार असलेल्या राधानगरी तालुक्यातील दाजीपुरात केवळ पाच तासांत तब्बल 137 मिलिमीटर पाऊस कोसळला. ढगफुटीसदृश पावसाने पाणीच पाणी झाले. कुंभी, कासारी लघु पाटबंधारे परिसरातही अतिवृष्टी       झाली. 


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती