To Reach The People & Community!
 दिनविशेष

 परभणी

शेतकऱ्यांचा दसरा धुमधडाक्यात होणार परभणीच्या नुकसानग्रस्तांना मिळाले भरपाईचे 154 कोटी

THE XYE   11-10-2023 14:02:02   106

शेतकऱ्यांचा दसरा धुमधडाक्यात होणार 

परभणीच्या नुकसानग्रस्तांना मिळाले भरपाईचे 154 कोटी

 

परभणी  दि. ११ ( प्रतिनिधी ) : पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. सन 2022 च्या पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून आता 3 लाख 90 हजार 758 शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणार आहे. थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हेक्टरी 8 हजार 500 रुपये या दराने 154 कोटी 48 लक्ष 7 हजार 680 रुपये रविवारपर्यंत जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा दसरा धुमधडाक्यात होणार आहे. 

     परभणी जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, गट विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांनी विशेष लक्ष घालून आपापल्या कार्यक्षेत्रातील सर्व पात्र बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आदेश दिले आहे. या निधीची मागणी अ, ब, क, आणि ड अशा चार अहवालानुसार शासनाच्या महसूल व वन विभागाकडे (मदत व पुनर्वसन) करण्यात आली होती. सर्व तहसीलदारांनी शेतकरी आणि त्यांच्या नावापुढील रक्कमेची यादी आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या संकेतस्थळावर अपलोड करावी व तसा अहवाल 15 ऑक्टोबरपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या कामामध्ये कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचेही त्यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.  

     सन 2022 मध्ये परभणी जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून नुकसानभरपाई मिळणार आहे. ज्यात जिल्ह्यातील 3 लाख 90 हजार 758 शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणार आहे. थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हेक्टरी 8 हजार 500 रुपये या दराने 154 कोटी 48 लक्ष 7 हजार 680 रुपये जमा केले जाणार आहे. तर, रविवारपर्यंत म्हणजेच 15 ऑक्टोबरपर्यंत हे पैसे जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिले आहेत.

 


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती