To Reach The People & Community!
 दिनविशेष

 मनोरंजन

जेष्ठ अभिनेते, नाट्य कलाकार प्रशांत दामले यांना यंदाचे विष्णुदास भावे गौरवपदक

THE XYE   17-10-2023 14:42:49   84

जेष्ठ अभिनेते, नाट्य कलाकार प्रशांत दामले यांना यंदाचे विष्णुदास भावे गौरवपदक

 

सांगली दि. १७ ( प्रतिनिधी ) : मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा नाट्य क्षेत्रातील विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार  जाहीर झाला आहे. अभिनेते प्रशांत दामले यांना यंदाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. यंदा दिले जाणारे हे 56 वे गौरव पदक आहे. 5 नोव्हेंबर रोजी रंगभूमीदिनाचे औचित्य साधून प्रशांत दामले यांना विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार दिला जाणार आहे. गौरवपदक, रोख रक्कम 25,000 हजार स्मृतीचिन्ह, शाल व श्रीफळ असे गौरवपदकाचे स्वरूप आहे.

       विष्णुदास  भावे गौरव पदक पुरस्कार हा मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा पुरस्कार असून नाट्य क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्यांना हा पुरस्कार प्रदान केला जातो. आतापर्यंत 54 वर्षांपासून हा नाट्यक्षेत्रातील मानाचा मानला जाणार पुरस्कार वितरित केला जात आहे. 

     अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समिती, सांगली ही संस्था गेली 80 वर्ष नाट्यक्षेत्रात कार्य करीत आहे. संस्थेतर्फे 5 नोव्हेंबर रंगभूमीदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. रंगभूमीदिनाचे औचित्य साधून नाटककार विष्णुदास भावे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ नाट्यक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या रंगकर्मीस विष्णुदास भावे गौरवपदक देऊन सन्मानित करणेत येते.  

     प्रशांत दामले यांनी फेब्रुवारी 1983 पासून आजपर्यंत 12500 पेक्षा अधिक नाटकांचे प्रयोग  केले आहेत. टूर टूर, पाहुणा, चाल काहीतरीच काय, गेला माधव कुणीकडे, बे दुणे चार, शूः कुठे बोलायचे नाही, एका लग्नाची गोष्ट, एका लग्नाची पुढची गोष्ट, जादू तेरी नजर, कार्टी काळजात घुसली, साखर खाल्लेला माणूस, सारख काहीतरी होतय, लेकुरे उदंड झाली ही त्यांची गाजलेली नाटकं आहेत. एकंदरीत प्रशांत दामले मराठी रंगभूमीवरील उत्कृष्ठ अभिनेते आहेत.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती