To Reach The People & Community!
 दिनविशेष

 अहिल्यादेवी नगर

भाजप प्रवेशासाठी १० आमदारांची यादी समोर

THE XYE   24-09-2023 15:58:27   99

"भाजप प्रवेशासाठी १० आमदारांची यादी समोर , उर्वरीत राष्ट्रवादीचा आता लवकरच अस्त”,अशी  बावनकुळेंची प्रतिक्रिया

अहमदनगर (प्रतिनिधी) : अजित पवार यांच्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसचा सूर्योदय झाला होता. परंतु आता अजित पवार महायुतीमध्ये सहभागी झाल्याने अनेकजण अस्वस्थ आहेत, कारण आता अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नसल्याने उर्वरीत राष्ट्रवादी काँग्रेसचा सूर्यास्त झालेला आहे, अस्त होत आलेला आहे. त्यातूनच राहिलेल्या राष्ट्रवादीमधून अजितदादांना डावलले जात असल्याची भाषा सुरू झाली आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नगरमध्ये बोलताना केली.

यावेळी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी आणखी १० आमदारांच्या प्रवेशाची यादी तयार आहे, असाही दावा केला. मात्र हे आमदार कोणत्या पक्षाचे आहेत, हे त्यांनी स्पष्ट केले नाही. भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांच्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात ‘महाविजय-२०२४’ अभियाना अंतर्गत ‘घरघर चलो’ यात्रेची सुरुवात नगर शहरातून प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या उपस्थितीत करण्यात आली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डावलण्याचे काम होत असल्याचा आरोप केला होता, त्या संदर्भात आमदार बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिल्या.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती