To Reach The People & Community!
 दिनविशेष

 अहिल्यादेवी नगर

शिर्डीच्या साईबाबा मंदिरात पेड दर्शन पास व आरती पासेससाठी आधार कार्ड किंवा अधिकृत ओळखपत्र अनिवार्य

THE XYE   11-10-2023 16:46:54   94

शिर्डीच्या साईबाबा मंदिरात पेड दर्शन पास व आरती पासेससाठी

आधार कार्ड किंवा अधिकृत ओळखपत्र अनिवार्य 

 

शिर्डी दि. ११ ( प्रतिनिधी ) : राज्य नव्हे तर देशभरातून हजारो साई भक्त  दररोज शिर्डीत हजेरी लावतात. यातील अनेकजण पेड दर्शनपास  घेऊन दर्शन घेतात. तर अनेक जण आरतीच्या पाससाठी रांगेत उभे राहतात. याचाच फायदा अनेकदा काही एजंट घेतात व साई भक्तांची फसवणूक होत असल्याचं समोर आल होत त्यामुळे एजंट याचा फायदा घेत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवाशंकर यांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर साईबाबा संस्थानने  आता पेड दर्शनपास व आरती पास साठी ओळखपत्र अनिवार्य केले असून जो साईभक्त पेड दर्शन पास घेईल किंवा ज्याला आरती करायची आहे. त्याच्याच नावाने ओळखपत्राची एन्ट्री करून पास दिला जाणार आहे. 

     साईबाबा संस्थानला आलेल्या तक्रारीनंतर आता साईबाबा संस्थानने पेड दर्शन पास व आरती पासेससाठी आधार कार्ड किंवा अधिकृत ओळखपत्र असणे अनिवार्य केले आहे. सामान्य दर्शन रांगेतून दर्शन घेण्यासाठी कुठल्याही पाचची आवश्यकता नाही. मात्र पेड पाच दर्शन किंवा आरती पास घ्यायचा असेल तर ओळखपत्र हे अनिवार्य असणार आहे. यासाठी तिरुपती बालाजीच्या धरतीवर असणारा सॉफ्टवेअर साईबाबा संस्थांनाअपडेट केला असून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. नवीन निर्णयाची अंमलबजावणी साईबाबा संस्थानने सुरू केले असून पेड पाच दर्शन घेताना आता ओळखपत्राचाही एन्ट्री या नवीन सॉफ्टवेअरमध्ये केली जाते. त्याचबरोबर आरती पाससाठी आरतीला उपस्थित असणाऱ्या सर्वच भक्तांची ओळखपत्र ही सुद्धा अनिवार्य करण्यात आली आहे. नवीन निर्णयानंतर अनेक साई भक्तांनी पास मिळण्यास उशीर होत असला तरी हे सुरक्षित असल्याचं सांगत या निर्णयाचा स्वागत केलं आहे. 

 

 

 


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती