To Reach The People & Community!
 दिनविशेष

 क्राईम विभाग

पुण्यातील ससून ड्रग्ज रॅकेट प्रकरणी; ललित पाटील चा भाऊ भूषण याला अटक

THE XYE   11-10-2023 12:01:23   42

पुण्यातील ससून ड्रग्ज रॅकेट प्रकरणी; ललित पाटील चा भाऊ भूषण याला अटक

 

 

पुणे.दि.११(प्रतिनिधी): ससून ड्रग्ज रॅकेट प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील याचा भाऊ  स्वत:  मॅफेड्रॉन बनविणारा भूषण पाटील याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने उत्तर प्रदेश येथील वाराणसीतून मंगळवारी सकाळी पकडले. 

ललित पाटील हा २ ऑक्टोबर रोजी ससून रुग्णालयातून संध्याकाळी पोलिसांना चकवा देऊन पळून गेला होता. त्यानंतर पुणे पोलिसांची १० पथके त्याच्या शोधासाठी पाठवण्यात आली होती. ३० सप्टेंबर रोजी गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विभागाने ससून रुग्णालयाबाहेर २ कोटींपेक्षा अधिक रकमेचे एमडी (मॅफेड्रॉन) पकडल्यानंतर यातील मुख्य आरोपी ललित आणि त्याचा भाऊ भूषण या प्रकरणात  असल्याचे या तपासात स्पष्ट झाले होते.

गेल्या आठ दिवसांपासून पोलिसांना तुरी देणारा भूषण सापडल्याने पुणे पोलिसांच्या आशा आता उंचावल्या आहेत. भूषणच्या आधारे लवकरच पोलिस ललितपर्यंत पोहोचतील, अशी शक्यता वर्तवला आहे. पुणे पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे भूषणला ताब्यात घेतल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती