To Reach The People & Community!
 दिनविशेष

 क्राईम विभाग

माय-लेकींचे हातपाय बांधून ‘वाॅचमन’ने

THE XYE   12-10-2023 13:31:11   46

माय-लेकींचे हातपाय बांधून ‘वाॅचमन’ने घरावर घातला दरोडा

 

पिंपरी. दि.१२. (प्रतिनिधी) : एका कुटुंबातील मायलेकींचे हातपाय बांधून त्यांच्या घरातील तब्बल २३ लाख ६० हजारांचा ऐवज लुटून नेला. यातील धक्कादायक बाब म्हणजे दरोड्यामध्ये याच कुटुंबाकडे नोकरीस असलेला तो वॉचमन, त्याची पत्नी, वॉचमनचा भाऊ, वहिनी आणि इतर दोन साथीदारांचा यामध्ये 1समावेश आहे. बालघरे वस्ती, कुदळवाडी, चिखली येथे मंगळवारी  (दि. १०) रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली.

 

     याप्रकरणी १९ वर्षीय तरुणीने  या घटनेची चिखली पोलिस ठाण्यात येऊन फिर्याद दिली. त्यानुसार पुढे संशयित वॉचमन महेश सुनार, त्याची पत्नी लक्ष्मी, त्याचा भाऊ कालू, त्याची पत्नी व इतर दोन साथीदार यांच्या विरोधात चिखली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाॅचमन महेश सुनार हा फिर्यादी तरुणीच्या कुटुंबीयांकडे वॉचमन म्हणून कामाला आहे. दरम्यान, मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास वाॅचमन महेश सुनार याने फिर्यादी तरुणी आणि तिच्या आईला बहाणा सांगून खाली बोलावले.

त्यानंतर बेडशिट आणि ओढणीच्या साहाय्याने त्यांचे हातपाय बांधून ठेवले. ‘अगर मुहसे आवाज निकाला तो जान से मार दुंगा’ अशी धमकी त्या दोघींना दिली. त्यानंतर महेश सुनार आणि त्याच्या साथीदारांनी घरात जाऊन सोने-चांदी व हिऱ्याचे दागिने, रोख रक्कम असा एकूण २३ लाख ६० हजारांचा ऐवज जबरदस्तीने चोरून तिथून पळ काढला. तसेच, जाताना पुरावा राहू नये, म्हणून घरातील डीव्हीआरदेखील चोरून नेला, असे फिर्यादीत नमूद आहे. संशयितांच्या शोधासाठी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेची विविध पथके गुजरात, उत्तर प्रदेश आदी राज्यांमध्ये रवाना झाली आहेत.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती