To Reach The People & Community!
 दिनविशेष

 क्रिकेट

टीम इंडियाला मोठा हादरा; न्यूझीलंडविरूद्ध होणाऱ्या सामन्यातून हार्दिक पांड्या बाहेर

THE XYE   20-10-2023 17:44:04   85

टीम इंडियाला मोठा हादरा; न्यूझीलंडविरूद्ध होणाऱ्या सामन्यातून हार्दिक पांड्या बाहेर

 

पुणे दि. २० ( प्रतिनिधी ) : भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या याच्या दुखापतीबाबत बीसीसीआयने अपडेट दिली आहे. हार्दिक पांड्याला पुण्यात बांगलादेशविरोधातील सामन्यात दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला सामना अर्ध्यावरच सोडावा लागला होता. आता त्याच्या प्रकृतीविषयी बीसीसीआयने माहिती दिली आहे. हार्दिक पांड्या न्यूझीलंडविरोधात खेळणार नाही, हे बीसीसीआयने स्पष्ट सांगितले आहे.

    बांगलादेशविरोधात पुण्यात गोलंदाजी करताना हार्दिक पांड्याला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याचं स्कॅनिंग करण्यात आले. यामध्ये हार्दिक पांड्याची दुखापत गंभीर नसल्याचे समोर आले आहे. डॉक्टरांनी हार्दिक पांड्याला आराम करण्याचा सल्ला दिला आहे. बीसीसीआयची मेडिकल टीम हार्दिक पांड्यावर लक्ष ठेवून आहे.  हार्दिक पांड्या टीम इंडियासोबत 20 ऑक्टोबर रोजी धर्मशाला येथे जाणार नाही. हार्दिक पांड्या लखनौमध्ये टीम इंडियासोबत जोडला जाईल. लखनौमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये लढत होणार आहे. 

    हार्दिक पांड्याच्या दुखापतीबाबत बीसीसीआयने सांगितलेल्या माहितीनुसार त्याची दुखापत गंभीर दिसत नाही. हार्दिक पांड्या टीम इंडियासोबत पुढील सामन्याला उपलब्ध असेल. भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये लखनौ येथे सामना होणार आहे. त्यासाठी हार्दिक पांड्या उपलब्ध असेल. न्यूझीलंडविरोधात रविवारी होणाऱ्या सामन्यात हार्दिक पांड्या उपलब्ध नसेल. 


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती