To Reach The People & Community!
 दिनविशेष

 माझी वाटचाल

10x10 स्क्वेअर फूट रामेश्वरम कॅफेचे मासिक उत्पन्न 4.5 कोटी, काय विशेष?

THE XYE   26-10-2023 23:29:30   17473

10x10 स्क्वेअर फूट रामेश्वरम कॅफेचे मासिक उत्पन्न 4.5 कोटी, काय विशेष?

Startup Story -Nitin Yelmar

जर तुम्ही रामेश्वरम कॅफेचा अभ्यास केला तर तुम्हाला समजेल की ते दररोज 7500 ऑर्डर कसे वितरित करतात. हे क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट (QSR) आउटलेट आहे. रामेश्वरम कॅफेच्या मालकाने स्थानिक बाजारपेठेतील अंतर ओळखण्याचा प्रयत्न केला. यानंतर रामेश्वरम कॅफेने दक्षिण भारतीय जागेत जिथे QSR ब्रँड नाही ते क्षेत्र शोधण्यास सुरुवात केली, त्यानंतर त्यांनी त्या तीन ठिकाणी रेस्टॉरंट सुरू केले.

रामेश्वरम कॅफे एका वर्षात ५० कोटींचा करतो धंदा .

रामेश्वरम कॅफेने स्विगी आणि झोमॅटोशिवाय हा धंदा केला आहे. रामेश्वरमचा धंधा वाढवण्यामागे कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत? याचा अभ्यास करायला हवा. त्याचा उपयोग व्यवसायाची सुरुवात करताना नक्की होऊ शकतो.

निखिल कामथ हा झिरोधा स्टार्टअपचा सहसंस्थापक आहे. युट्युब आणि स्पॉटीफायवर तो पॉडकास्ट प्रदर्शित करत असतो. त्यामध्ये ‘उडाण’ स्टार्टअपचे संस्थापक सुजित कुमार यांनी रामेश्वरम कॅफे ५० कोटींचा व्यवसाय करतो हे सांगितले होते. त्यानंतर त्या कॅफेबाबतच्या चर्चाना उधाण आले होते.

◾रामेश्वरमचा व्यवसाय कसा वाढला ते आपण खालील मुद्यांच्या आधारे समजून घेऊयात. 

 

१. जलद सेवा देणाऱ्या रेस्टोरंटचे स्थानिकीकरण होत आहे –  

रामेश्वरम हॉटेलच्या मालकाने स्थानिक बाजारातील गॅप ओळखण्यासाठी अनेक वेळ खर्च केला. 

दक्षिण भारतीय ब्रँड नसलेली क्षेत्र शोधण्यावर रामेश्वरमने सुरुवातीला लक्ष दिले. बंगळूर शहरातील त्यांची ३ ठिकाणे अशाच ठिकाणी सुरु करण्यात आली आहेत. 

२. ब्रॅण्डने लोकांचे लक्ष वेधून घ्यायला हवे – 

रामेश्वरममधील आकर्षित केली जाणारी गोष्ट कोणती आहे? त्यांचा तुम्ही लोगो पहिला आहे का? हा लोगो अतिशय उत्तम पद्धतीने बनवण्यात आला आहे.

 येथे असणाऱ्या प्रत्येक छोट्या गोष्टीमुळे कॅफेचे ब्रॅण्डिंग होत आहे. लोकल ब्रॅंडिंग चेनच्या ठिकाणी अनेकवेळा दुर्लक्ष करताना दिसतात.  

३. वाढती श्रेणी – 

आपण सहज विचार केला तर कोणता लोकल ब्रँड मोठ्या प्रमाणावर स्केल झाला आहे? विविध पद्धतींच्या कॅटेगरी मध्ये ब्रँड वाढत जातात. 

सर्वसाधारण विचार केल्यावर बर्गर पिझ्झाच्या फ्रेंचाईझी दक्षिण भारतीय फूडपेक्षा का वाढत चालल्या आहेत? याचा अभ्यास करायला हवा. 

४. प्रोडक्ट्चा अनुभव कायम घेत राहणे – 

कोणत्याही खाद्यपदार्थाची गुणवत्ता कायमच चांगली क्वालिटी देण्यावर अवलंबून असते. वर्षभर एकच चव अन्नाला असणे यावर बरेच काही अवलंबून असते. 

आपण याचा अभ्यास करायला हवा की, रामेश्वरम कॅफे ७५०० ऑर्डर या २० बाय ३० च्या दुकानातून कशा काय देऊ शकतो? 

५. सोशल मीडियावरच्या हजेरीचा फायदा –

आपण रामेश्वरमच्या इंस्टाग्राम लोकेशनवर गेलात तर आपल्याला प्रत्येक दिवसाच्या स्टोरीज आणि फोटोज पाहायला मिळतील. इंस्टाग्राम आणि ट्विटरवर त्या दररोज पोस्ट केल्या जातात. 

नवीन ग्राहक आकर्षित करणे आणि जुन्या ग्राहकांना दुकानापर्यंत आणण्याचे काम यामाध्यमातून केले जाते. 

६. मार्केटचा खोलवर अभ्यास करणे –

रामेश्वरमच्या मालकांनी अनेक दिवस घेऊन मार्केट मधील गॅप लक्षात घेतला होता.

 बंगळूर मध्ये चांगले साऊथ इंडियन जेवणाचे हॉटेल्स आहेत. पण प्रत्येक ठिकाणी चांगले हॉटेल असेलच असे नव्हते. त्यामधीलच एक भाग इंदिरानगर हा होता. अनेक हॉटेल्स येथे होते पण साऊथ इंडियन कोणतेही चांगले हॉटेल नव्हते. 

७. योग्य जागेची निवड करणे –

रामेश्वरमने मॅकडोनाल्ड प्लेबुकचा धडा इंदिरानगर भागात वापरायचे ठरवले होते. 

ज्या ठिकाणी व्यावसायिक लोक असतात असे ठिकाण निवडून प्रेक्षकांना दक्षिण भारतीय खाद्यपदार्थांची प्रीमियम किंमत मोजायला भाग पाडले. 

८. अतिशय छोटा मेन्यू 

रामेश्वरम कॅफेत असणाऱ्या मेन्यूमध्ये ६ प्रकारच्या डिश असून कमी पदार्थांमधून चांगला धंदा केला जातो हे यांनी दाखवून दिले आहे. 

इडली डोसा, खाराभात तुपासोबत, चहा आणि फिल्टर कॉफी याठिकाणी दिली जाते. येथे असणारा शेफ हा चवीवर लक्ष देणारा असून यामधून १०० विविध प्रकारच्या चवींचा प्रश्न सोडवला जातो.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती