To Reach The People & Community!
 दिनविशेष

 छत्रपती संभाजी नगर

लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेच्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराला मोठा प्रतिसाद

THE XYE   30-09-2023 23:21:17   96

लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेच्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराला मोठा प्रतिसाद

संस्थापक अध्यक्ष दिनकर आमकर

यांची प्रमुख उपस्थिती

छत्रपती संभाजी महाराज नगर*दि.29 (प्रतिनिधी) - लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेच्या माध्यमातून जागो ग्राहक जागो या अंतर्गत लाखो लोकांना जागरूक करुन सर्व सामान्य माणसाच्या फसवणुकीला आळा घातला जातो. त्यामुळे आजच्या काळात या उपक्रमाला सर्व पदाधिकारी व सदस्यांनी प्रथम प्राधान्य द्यावे असे प्रतिपादन लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिनकर आमकर यांनी केले.

छत्रपती संभाजी महाराज नगर येथे आयोजित करण्यात आलेल्या नुतन पदाधिकारी, कार्यकर्ता व सदस्यांना प्रबोधन आणि प्रशिक्षण शिबिरात दिनकर आमकर बोलत होते. सिडको परिसरातील कन्व ब्राह्मण संघाच्या सभागृहात आयोजित केलेल्या या शिबिरात छ. संभाजी महाराज नगर, जालना, बीड शहर व जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशिक्षण मिटींगला संस्थेचे अध्यक्ष दिनकर रामकर संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राजेंद्रजी जडे साहेब संस्थेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अमोलजी पुरकर संस्थेचे महाराष्ट्र राज्य संघटक योगेश आणि शैलेश कागलकर तसेच महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्ष मीनाताई गायके पाटील तसेच सरचिटणीस अनिता जोशी संस्थेचे संघटक दत्तात्रय सुभेदार व संभाजीनगरचे शहर प्रमुख रविंद्रजी पंडित व संभाजीनगर मधले जुने जाणते मंडळी तसेच जालना जालना जिल्ह्यातून पत्रकार मकरंद जहांगीरदार हे आवर्जून उपस्थित होते.

लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेची प्रशिक्षणार्थी शिबिर पार पडले.  ज्यांना संस्थेविषयी कामाविषयी माहिती हवी होती असे अनेक लोक एकत्र आले होते आणि एक उत्तम प्रकारे संवाद झाला. यावेळी त्यांनी संस्थेचे काम पुढे करण्याची आपली तयारी दर्शवली आणि अशीच माहिती पुन्हा पुन्हा आम्हाला मिळावी अशा प्रकारची सुद्धा मागणी केली.

आज लोक कल्याण ग्राहक संरक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री दिनकर आमराव सर आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष माननीय श्री राजेंद्र जडे आणि छत्रपती संभाजी नगरचे दिनेश जी कुलकर्णी यांची महर्षी  काण्व महिला नागरी पतसंस्थेला भेट दिली त्याप्रसंगी संस्थेचे कोषाध्यक्ष धनंजय सीमंत माहिती दिली. यावेळी लोक कल्याण ग्राहक संस्थेचे महाराष्ट्र राज्य संघटक मा .श्री. दत्तात्रेय सुभेदार आणि श्री पांडे सर  यांची उपस्थिती होती.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती