To Reach The People & Community!
 दिनविशेष

 छत्रपती संभाजी नगर

चांगल्या कोचेसची जोड मिळाली तर निश्चितच विद्यापीठातून ऑलिंपिक खेळाडू घडतील- ऑलंपियन विक्रम पिल्ले

THE XYE   01-10-2023 14:23:36   94

चांगल्या कोचेसची जोड मिळाली तर निश्चितच येणाऱ्या काळात विद्यापीठातून ऑलिंपिक खेळाडू घडतील- ऑलंपियन विक्रम पिल्ले

छत्रपती संभाजी महाराज नगर दि 1 (क्रीडा प्रतिनिधी) -

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा सुविधा उपलब्ध असून जर या इन्फ्रास्ट्रक्चरला चांगल्या कोचेस् ची जोड मिळाली तर निश्चितच येणाऱ्या काळात विद्यापीठातून ऑलिंपिक खेळाडू निर्माण होतील असा विश्वास ऑलंपियन विक्रम पिल्ले यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी भारताचे ऑलम्पिकमध्ये प्रतिनिधित्व करणारे व हॉकीच्या अनेक वर्ल्ड कप व एशियन गेम्स मध्ये भारताला विजयश्री मिळून देणारे विक्रम पिल्ले यांची डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्या परिषदेवर नेमणूक केली आहे. त्यानिमित्त विक्रम पिल्ले यांनी आज विद्यापीठातीला भेट दिली. तेव्हा त्यांनी क्रीडा विभागाच्या स्विमिंग पूल, बॅडमिंटन हॉल, फुटबॉल-व्हॉलीबॉल ग्राउंड तसेच ॲथलेटिक्स ग्राउंडची पाहणी करत समाधान व्यक्त केले व विद्यापीठाने अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पोर्ट्स अकॅडमीज बरोबर एम.ओ.यु. करण्याचेही क्रीडा संचालक डॉ.दयानंद कांबळे यांना सुचवले. ज्यामुळे त्या अकॅडमीस् कडे उपलब्ध आंतरराष्ट्रीय कोचेसची सेवा आपल्या विद्यापीठातील उद्यांमुख खेळाडूंना घेता येईल आणि जर विद्यापीठाच्या या इन्फ्रास्ट्रक्चरला चांगल्या कोचेस् ची जोड मिळाली तर निश्चितच येणाऱ्या काळात विद्यापीठातून ऑलिंपिक खेळाडू घडतील अशा विश्वास ही पिल्ले यांनी व्यक्त केला.

यावेळी त्यांच्या सोबत विद्यापीठांचे माजी सिनेट सदस्य व क्रीडा भारतीचे अध्यक्ष पंकज भारसाखळे, आंतरराष्ट्रीय हॉकी कोच सागर ठाकूर यांची विशेष उपस्थिती होती. तसेच विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन क्रीड़ा स्पर्धेचा दर्जा उंचोन्यासाठी तसेच ऑल इंडिया यूनिवर्सिटीच्या गेम्स पूर्वीच्या कॅम्पसमध्ये करता येणाऱ्या अपग्रेडेशन संदर्भात डी.पी.आर तयार करण्याच्या ही सूचना पिल्ले यांनी यावेळी दिल्या.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती