To Reach The People & Community!
 दिनविशेष

 मुंबई शहर

किसननगर भागात पुनर्विकास योजना राबविण्यास राज्याच्या मंत्रिमंडळाने दिली मान्यता

THE XYE   20-10-2023 17:10:45   97

 किसननगर भागात पुनर्विकास योजना राबविण्यास

राज्याच्या मंत्रिमंडळाने दिली मान्यता

 

मुंबई दि. २० ( प्रतिनिधी ) : ठाणे येथील किसननगर परिसरापाठोपाठ आता शहरातील टेकडी बंगला, हजुरी आणि  उर्वरित भागात समुह पुनर्विकास (क्लस्टर) योजना राबविण्यास राज्याच्या मंत्रिमंडळाने गुरुवारी मान्यता दिली. यामुळे या भागातही क्लस्टर योजनेचा प्रकल्प राबविण्याचा मार्ग मोकळा झाला असून या ठिकाणी प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होण्याची चिन्हे आहेत.

      किसननगर परिसरापाठोपाठ आता शहरातील टेकडी बंगला, हजुरी आणि किसननगरमधील उर्वरित भागात समुह पुनर्विकास (क्लस्टर) योजना राबविण्यात येणार आहे. महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्राद्योगिकी मर्यादित  या शासकीय कंपनीच्या माध्यमातून येथे हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाला अधिक कार्यक्षम करण्यासाठी आणि नवीन योजना राबविण्यासाठी महाप्रित या सहयोगी कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. या कंपनीमार्फत परवडणारी घरे, शहरी नियोजन, अक्षय ऊर्जा, कृषीमुल्य साखळी, पायाभूत सुविधा प्रकल्प राबविण्यास १० जुलै रोजी मान्यता देण्यात आली आहे. त्याला अनुसरुन ठाणे शहरातील टेकडी बंगला, हजुरी आणि किसननगरमधील उर्वरित भागात समुह विकास प्रकल्प राबविण्यासाठी ठाणे महापालिकेबरोबर सामंजस्य करार करण्यात आला आहे. 

    ठाणे शहरात मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारती पावसाळय़ात कोसळून जीवितहानी होते. अशा घटना टाळण्यासाठी अनधिकृत आणि अधिकृत इमारतींचा सुनियोजित तसेच संपूर्ण नागरी पायाभूत सुविधांसह पुनर्विकास करण्यासाठी क्लस्टर योजना राबविण्यात येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा महत्वकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी ४५ नागरी पुनरुत्थान आराखडे ठाणे महापालिकेने तयार केले होते. त्याचे एकूण  क्षेत्रफळ १५०० हेक्टर आहे. पहिल्या टप्प्यात किसननगर भागात सिडकोच्या माध्यमातून हा प्रकल्प राबविण्यात येत असून याठिकाणी प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून नागरिकांना हक्काची आणि मालकी घरे मिळणार आहे.

 


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती