To Reach The People & Community!
 दिनविशेष

 मुंबई शहर

गरबा प्रेमींसाठी आनंदाची बातमी; आजपासून ३ दिवस रात्री १२ वाजेपर्यंत गरबा खेळण्यास परवानगी

THE XYE   21-10-2023 16:55:40   96

गरबा प्रेमींसाठी आनंदाची बातमी;

आजपासून ३ दिवस रात्री १२ वाजेपर्यंत गरबा खेळण्यास परवानगी

 

मुंबई दि. २१ ( प्रतिनिधी ) : मुंबई उपनगरातील नागरिकांना आता २ दिवस नाही, तर तीन दिवस मनसोक्त गरबा खेळता येणार आहे. आजपासून ३ दिवस रात्री १२ वाजेपर्यंत गरबा खेळण्यास परवानगी देण्यात आली आहे. या संदर्भातील परिपत्रक मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांकडून शुक्रवारी प्रसारित करण्यात आले. गरबाप्रेमींना गरब्यासाठी अधिकचा एक दिवस वाढीव वेळ देण्यात यावा, अशी मागणी भाजप विधान परिषद गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

       नवरात्रीनिमित्त गरबा खेळण्यासाठी उत्तर मुंबईत १० ते १२ मोठ्या गरब्यांचे आयोजन करण्यात आले आहे. एका सार्वजनिक गरब्यामध्ये दिवसाला एक ते दीड लाख जण गरबा खेळण्याचा आनंद घेत आहेत. परंतु या उत्सवप्रेमींची कामावरून घरी परतण्याची वेळ आणि गरबा बंद होण्याची वेळ यात खूप कमी अंतर असल्यामुळे वेळेअभावी त्यांना त्याचा पुरेपूर आनंद घेता येत नाही. त्यामुळे वाढवून दिलेली वेळ ही दोन ऐवजी तीन दिवस करावी, अशी मागणी दरेकर यांनी केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मुंबई उपनगर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी परिपत्रक काढून ही मुभा दिली.

 

 


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती