To Reach The People & Community!
 दिनविशेष

 नॅशनल

इंटेल आणि शरद पवार !

THE XYE NEWS   27-10-2023 21:03:19   13607

इंटेल आणि शरद पवार !

'इंटेल कॉर्पोरेशन' ही कंपनी कंप्यूटर जगातील सर्वात मोठी सेमीकंडक्टर चिप/मायक्रोप्रोसेसर निर्माण करणारी कंपनी आहे. या कंपनीचे मुख्यालय कॅलिफोर्नियातील सँन्टा क्लारा इथे असून क्रेग बँरट अध्यक्ष आहेत. इंटेल कंपनी संगणकाचे प्रशिक्षण अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावं या उद्देशाने काम करते.

बारामतीतील 'विद्या प्रतिष्ठान' च्या माध्यमातून ग्रामीण भागातील मुलांना संगणक शिक्षण देण्याचं उत्तम काम करत आहे, अशी माहिती इंटेल पर्यंत पोहोचली होती. या कामाची त्यांना प्रत्यक्ष पाहणी करायची होती. 

खेड्यापाड्यातील मुलांपर्यंत  संगणक शिक्षणाची ची सोय विद्या प्रतिष्ठाने संगणक असलेल्या बसेस मधून सुरु केली होते. अशा बसेस मध्ये साधारणतः  वीस संगणक असतात  ते चालविण्याकरिता बस मध्ये जनरेटर बसवलेला असतो.  त्या बसमध्ये प्रशिक्षकही असतात. वेळापत्रकानुसार  बारामतीच्या आजूबाजूच्या भागातल्या  जिल्हा परिषदांच्या शाळेत आठवड्यातून एकदा ही बस जाते आणि विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देते. या कामाची बॅरेट यांना प्रत्यक्ष पाहणी करायची होती.  त्यांनी तसं पत्र लिहून कळवले आणि भेटीसाठी आले. पवार साहेब त्यांना घेऊन  विद्या प्रतिष्ठानचे काम  कसं सुरु आहे  हे दाखवण्यासाठी घेऊन जाऊ लागले. पंरतू बॅरेट यांना त्यांच्या पद्धतीने या कामाची पाहणी करायची होती. प्रतिष्ठानच्या संगणक बसेस ज्या ज्या गावात जातात त्याचा नकाशा पाहीला आणि त्या नकाशावरील एका गावावर बोट ठेवून या गावाची पाहणी करायची आहे असं सुचवलं. ते गाव होतं दीडशे लोकसंख्या असणारे 'लिमटेक'. पवारसाहेब, त्यांना घेऊन लिमटेकला गेले. सोबत संगणक बस होतीच.  बस गावात पोचताच गावातल्या मुलांनी बसमधील संगणकाचा ताबा घेतला.  बॅरेट यांनी एका मुलीकडून संगणकप्रशिक्षणा विषयी चौकशी करुन घेतली. त्या मुलीचे सफाईदारपणे संगणक हाताळण्याचे कौशल्य पाहून बँरेट खुप खुष झाले. त्यांनी त्या मुलीला विचारलं, 'तुझी काय इच्छा आहे?' त्या मुलीने गमतीदार उत्तर दिले. ती म्हणाली,'रोज गुरुवार असावा!'  लिमटेक गावात दर गुरुवारी संगणक बस येत असल्याने रोज हाताळायला मिळावा या हेतूने तिने तसं उत्तर दिले. या उत्तराने बँरेट साहेब खुष होऊन त्यामुलीस लँपटाँप भेट दिला.

शरद पवाराच्या दिशादर्शकाने 'विद्या प्रतिष्ठान' चे त्या भागातील संगणकप्रशिक्षणाचे अत्यंत पोटतिडकीनं आणि निष्ठेनं चालू असलेले काम पाहून बँरेट यांनी  इंटेल कंपनी मार्फत  संगणक लँब असणाऱ्या पस्तीस बसेस 'विद्या प्रतिष्ठान' ला भेट दिल्या.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 लोकांच्या प्रतिक्रिया


THE XYE
Adv Appasaheb Shinde a 27-10-2023 21:45:28

Cz Sharad Pawarsaheb is physically Scientist all the wings of knowledge including I.T.Technology,Admin.politics,Agriculture,educations,World politicals,Cricket,etc.So,he made Vidya Pratishthan as model of Indian Rural and urban developments.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती