To Reach The People & Community!
 दिनविशेष

 वर्ल्ड

स्विस हेल्थकेअर कंपनी ‘रोश’ चे डिजिटल सेंटर ऑफ एक्सलन्स पुण्यामध्ये सुरू

Nitin Yelmar   24-01-2024 11:13:40   24606

एआय तंत्रज्ञानाच्या उपयोगामुळे डिजिटल उत्पादने कॉस्ट इफेक्टीव्ह

पुणे (Nitin Yelmar) :  ‘रोश’ या बहुराष्ट्रीय कंपनीने पुण्यात ‘डिजिटल सेंटर फॉर एक्सलन्स’ हे जागतिक केंद्रांचे मंगळवारी उद्घाटन केले. रोश आरोग्यसुविधांशी निगडित डिजिटल उत्पादनांचा जगभरात पुरवठा करत आहे. यासाठी नविन अत्याधुनिक उत्पादनासाठी कंपनी एआय तंत्रज्ञानाचा उपयोग होणार आहे. ज्यामुळे उत्पादने कॉस्ट इफेक्टीव्ह असणार आहेत.

उद्घाटनावेळी रोश इन्फॉर्मेटिक्स सेंटरचे जागतिक प्रमुख मॉर्टिझ हार्टमन आणि रोश इन्फॉर्मेशन सोल्यूशन्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक राजा जमालमडाका उपस्थित होते.

रोशने पुण्यातील बाणेर भागात दोन लाख चौरस फूट जागेवर हे केंद्र सुरू केले आहे. सध्या या केंद्रात ३५० मनुष्यबळ कार्यरत असणार आहे. आगामी काळात कंपनीकडून मॅनपावरमध्ये मोठयाने वाढ कऱण्याचे नियोजन आहे. डिजिटल आरोग्य सुविधा क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कंपनीकडून केला जात आहे. क्लाऊड कॉम्प्युटिंग, एआयआणि मशिन लर्निंग यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर कंपनी करीत आहे.

या सेंटर मध्ये हेल्थकेअर क्षेत्रात डिजिटल उत्पादने तयार करून त्यांचा पुरवठा जगभरात केला जाणार आहे. स्थानिक गुणवत्तेला प्राधान्य देण्याचे धोरण कंपनीने अवलंबिले आहे. याचबरोबर देशभरातील आघाडीच्या शिक्षण संस्थांमधील गुणवत्तेलाही संधी दिली जात आहे.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती