To Reach The People & Community!
 दिनविशेष

 वर्ल्ड

'योग ऊर्जा' स्टार्टअपच्या फाऊंडर "देवयानी एम" यांच्या " लिव्ह लाईक अ योगी" पुस्तकाचे प्रकाशन

Nitin Yelmar    30-01-2024 17:24:11   25297

लिव्ह लाइक अ योगी - आसनांपलीकडील योगाधारित जर्नी ऑफ आऊटसाइड टू इनसाइड

नवनवीन कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक,  'पर्सिस्टंट सिस्टीम्स'चे संस्थापक अध्यक्ष डॉ. आनंद देशपांडे यांचे मत

पुणे : देवयानी एम. लिखित 'लिव्ह लाइक अ योगी' या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन शुक्रवारी झाले. देवयानी यांनी आयआयएम मधून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. त्या आपल्या "योग ऊर्जा" स्टार्टअप व्दारे कॉर्पोरेट क्षेत्रातील व्यक्तीना योगाचे धडे देतात.  

यावेळी 'पर्सिस्टंट सिस्टीम्स'चे संस्थापक अध्यक्ष डॉ. आनंद देशपांडे, अभिनेते सुबोध भावे, कैवल्यधाम योग संस्थेचे माजी प्राचार्य प्रा. डॉ. शरदचंद्र भालेकर, 'सकाळ माध्यम समूहा'चे सीईओ उदय जाधव आदी उपस्थित होते.

"नैतिक मूल्ये, काळानुसार केलेले बदल आणि कृतीतील सातत्य ही यशाची त्रिसूत्री आहे. सर्वोच्च यश मिळवण्यासाठी नैतिक मूल्ये, ध्येयाविषयीची स्पष्टता, त्यासाठी केलेली सातत्यपूर्ण कृती, कालसुसंगत बदल आणि नवनवीन कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक असते," असे प्रतिपादन 'पर्सिस्टंट सिस्टीम्स'चे संस्थापक अध्यक्ष डॉ. आनंद देशपांडे यांनी केले. चांगली कृतीसुद्धा महिन्याच्या शेवटी ३० मिनिटांइतकी होते. हेच सातत्याचे महत्त्व आहे. आपल्या शरीराच्या ह्यका लक्षपूर्वक ऐकल्या तर बहुतेक व्याधी टाळता येतील." लेखिका देवयानी एम. यांच्या उद्योजक वृत्तीचा, नावीन्यपूर्ण दृष्टिकोनाचे विशेष कौतुक केले.

जर्नी ऑफ आऊटसाइड टू इनसाइड पलीकडे असणारी योगाधारित जर्नी ऑफ आऊटसाइड टू इनसाइड  केल्यास आरोग्यपूर्ण जगणे शक्य होईल," अशी भूमिका घेऊन लिव्ह लाईक अ योगों' या पुस्तकाचे लेखन झाले आहे,"  ज्याप्रमाणे शरीराला उपयोगी व्यायाम आहे त्याप्रमाणे मनासाठी कोणती जीम नाही.  त्यासाठी योगशास्त्र आपल्याला मदत करते. योग म्हणजे केवळ आसनां पुरते मर्यादित नसून खूप व्यापक आहे.  योग हा विषय खूप कंटाळवाणा विषय आहे असे अजीबात नाही. योग म्हणजे केवळ आसने आणि प्राणायाम नाही; तर ती एक जीवनशैली आहे. असे वाचकांना पुस्तकातून सांगण्याचा प्रयत्न आहे, असे लेखिका देवयानी एम. यांनी या वेळी सांगितले.

"स्वतःच्या शरीराची आणि मनाची नोट ओळख करून घेतल्यावरच स्वतःतल्या सुप्त शक्तीचा अनुभव घेता येतो. त्यामुळेच शरीरात किंवा मनात बदल घडवायचा असेल तर स्वतःला वेळ देणे आवश्यक आहे," असे मत भावे यांनी व्यक्त केले. आपली पूर्ण ऊर्जा देऊन एखादी भूमिका निभावणे ही एक प्रकारची योगसाधना असल्याचेही त्यांनी सांगितले.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती