To Reach The People & Community!
 दिनविशेष

 पुणे शहर

जी एच रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंटचे सावित्रीबाई फुले विद्यापीठात विज्ञान तंत्रज्ञान इनोव्हेशन प्रदर्शन

THE XYE   18-10-2023 19:24:10   65

जी एच रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंटचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विज्ञान तंत्रज्ञान इनोव्हेशन प्रदर्शन

पुणे, ता. 17- माजी राष्ट्रपती आणि महान शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त नुकतेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यपीठात 'इनोव्हेशन डे २०२३' च्या निमित्ताने रिसर्च पार्क फाउंडेशनतर्फे येथील हॉलमध्ये विज्ञानातील इनोव्हेशन प्रदर्शन भरविण्यात आले होते.

 

यावेळी जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंटच्यावतीने स्टाॅल लावण्यात आले. स्मार्ट हेल्थ मॅनिटरिंग सिस्टिम, तणनाशक प्लाज्मा कटर, कवच हॅकेथॅनमधील विजेता प्रकल्प यावेळी ठेवण्यात आले होते. या निमित्त आयोजित तंत्रज्ञान प्रदर्शनात विविध प्रयोग, उपक्रम, व प्रकल्पांचे सादरीकरण जी एच रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्याद्वारे करण्यात आले. यावेळी सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग कालकर, रिसर्च पार्क फौंडेशनचे सी.ई.ओ. डॉ. अरविंद शालिग्राम यांनी प्रदर्शनाला भेट दिली. 

सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठाच्या रिसर्च पार्क फाउंडेशनतर्फे आयोजित या कार्यक्रमात विज्ञानातील नवनविन संकल्पनांवर दिवसभर चर्चा झाली. यावेळी विज्ञान, तंत्रज्ञान, व्यवसाय या विषयातील तज्ज्ञ मंडळींनी आपापल्या क्षेत्रातील ताज्या घडामोडींवर चर्चेतून, सादरीकरणातून प्रकाश टाकला. हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले होते. या कार्यक्रमास विज्ञान आणि उद्योगातील प्रगती जाणून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या सर्वांनी भेट दिली. रायसोनी कॉलेजतर्फे इंब्क्युबेश आणि इनोव्हेश प्रकल्पाचे प्रमुख डॉ. स्वप्निल महाजन व संशोधन आणि विकास विभागाचे सहाय्यक अधिष्ठाता डॉ. आशा शेंडगे कार्यक्रमास विद्यार्थ्यांसोबत उपस्थित होते. जी. एच. रायसोनी कॉलेजचे कॅम्पस संचालक डॉ. रवींद्र खराडकर यांनी विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांना प्रोत्साहन दिले. जी.एच रायसोनी ग्रुप ऑफ इंन्स्टीट्युशनचे अध्यक्ष श्री. सुनील रायसोनी आणि जी.एच रायसोनी ग्रुप ऑफ इंन्स्टीट्युशनचे कार्यकारी संचालक श्री श्रेयश रायसोनी यांनी विद्यार्थ्यांचे आणि प्रकल्पाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.  


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 लोकांच्या प्रतिक्रिया


THE XYE
गोपाळ महाजन 19-10-2023 21:56:46

Nice activities


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती