To Reach The People & Community!
 दिनविशेष

 पुणे शहर

सोमनाथ नगरमध्ये श्री तुळजाभवानी मंदिरात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात!

THE XYE   19-10-2023 00:17:42   66

आपल्या संस्कृती परंपरा जपून सण उत्सव साजरे करा - एपीआय निलेश घोरपडे

सोमनाथ नगरमध्ये श्री तुळजाभवानी मंदिरात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात!

 

पुणे दि. 18 (प्रतिनिधी) - भारतीय संस्कृती आणि परंपरा जतन करण्यासाठी सदैव जागरूक राहिले पाहिजे. या काळात चांगले संस्कार होणे आवश्यक आहे म्हणून उत्तम व अभ्यासू अशा व्यक्ती, संस्था यांच्या मार्गदर्शनाखाली व्याख्यान, कार्यशाळा आयोजित करण्यात याव्यात असे मत एपीआय निलेश घोरपडे यांनी व्यक्त केले.

सोमनाथ नगर येथील श्री अशोक माने यांच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या श्री तुळजाभवानी माता मंदिरात महात्मा फुले पोलीस चौकीत कार्यरत असलेले एपीआय  निलेश घोरपडे व शिवसेना प्रभागप्रमुख संतोष येमुल यांच्या हस्ते आरती करण्यात आली. त्यानंतर घोरपडे यांचा मंदिराचे संचालक ऍडव्होकेट ओंकार माने यांनी सत्कार केला, त्यास उत्तर देताना आपल्या मनोगतात त्यांनी सांगितले की, आपल्या देशात संस्कृती आणि परंपरा जपण्यासाठी सणवार उत्सव साजरे करण्यात येतात. त्या काळात आपल्या जबाबदाऱ्या म्हणून कार्य केले पाहिजे. 

शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते व वडगाव शेरी विधानसभा निवडणूक प्रभाग प्रमुख संतोष येमुल यांचा  सत्कार गणपतराव डांगे यांनी केला आणि मंदिराचे मुख्य अशोक माने यांनी निवृत्त आर्मी मेजर शाहीर गायकवाड यांचा सत्कार केला. यावेळी एक्सट्रीम न्यूज इंडियाचे संपादक संजय कुमार जोशी यांच्या हस्ते भारतीय जनता पक्षाचे नेते आणि विमान नगर विभागाचे नगरसेवक राहुल भंडारे यांचा सत्कार करण्यात आला. 

 

 

याप्रसंगी मंदिराची उभारणी व पार्श्वभूमी विशद करताना अशोक माने यांनी सांगितले की, आम्ही श्री क्षेत्र तुळजापूर येथे गेलो असताना श्री तुळजाभवानी मंदिरात मळवटाचं कुंकू एका व्यक्तीने मला दिले होते, त्यानंतर आम्हाला आमच्या भाडेकरू व्यक्तीने घरात घुंगरूचा आवाज ऐकू येत आहे असे सांगितले. आम्ही त्यानंतर काही जाणकार लोकांना याबद्दल बोललो असतांना आमच्या घराच्या बाहेर एका मोकळ्या खासगी जागेवरुन हा आवाज येत आहे आणि तेथेच देवीचं वास्तव्य आहे असे समजले.

त्यानंतर माझ्या पत्नीच्या म्हणजे सौ.मंगल माने यांनी केलेल्या आग्रह व सहकार्याने मी ही जागा विकत घेतली. मंदिर बांधकाम केले, मंदिरात श्री क्षेत्र पंढरपूर येथून श्री तुळजाभवानी मूर्ती आणून 2013 यावर्षी प्रतिष्ठापणा केली आहे. विशेष म्हणजे ही मूर्ती श्री तुळजाभवानी देवीची हुबेहूब प्रतिमा स्वरूपात आहे. आम्ही प्रत्येक सणवार, पौर्णिमा पुजा अर्चना करतो, नवरात्रात उत्स्फूर्तपणे भाविकांसोबत उत्सव साजरा करतो. दरवर्षी कोजागरी पौर्णिमेला महाप्रसाद असतो.

सुंदर, उठावदार, रुबाबदार मूर्ती  

 

या मंदिरात तुळजाभवानीची मूर्ती अत्यंत सुंदर तर आहेच, त्याचप्रमाणे ही मूर्ती उठावदार आणि रुबाबदार अशी देखणी पण आहे. वडगाव शेरी आणि या परिसरातील असंख्य भाविक या ठिकाणी जाऊन नतमस्तक होतात. अनेक भाविकांची श्रद्धा असल्याने नवरात्रात हजारो भक्त दर्शनासाठी येतात. अनेकांना या दर्शनाला आल्यानंतर साक्षात्कार झाला आहे असे प्रत्यक्ष अनुभव घेतल्यानंतर ते व्यक्त होतात. मंदिरात प्रवेश केल्यावर प्रसन्नता आणि शांतता जाणवते.

आज चौथी माळ संध्याकाळी मंदिरात आरती करण्यासाठी महिलांची गर्दी झाली होती. भाविकात पुरुष वर्ग आणि  युवक-युवती, लहान मुले दिसून आले. स्थानिक कार्यकर्ते रफिक मुलाणी, बलराम मुळीक इ. यावेळी उपस्थित होते.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 लोकांच्या प्रतिक्रिया


THE XYE
SANTOSH YEMUL 19-10-2023 12:00:05

KHUP CHAN ..MANDIR AHE.KHUPACH PRASANNA VATAVARAN EKDCHE AHE.

THE XYE
SANTOSH YEMUL 19-10-2023 12:00:09

KHUP CHAN ..MANDIR AHE.KHUPACH PRASANNA VATAVARAN EKDCHE AHE.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती