To Reach The People & Community!
 दिनविशेष

 पुणे शहर

पुणे शहरात लोकप्रिय ठरलेली मेट्रो महागली

THE XYE   19-10-2023 17:28:01   46

पुणे शहरात लोकप्रिय ठरलेली मेट्रो महागली 

 

पुणे दि. १९ ( प्रतिनिधी ) : पुणे शहराचा विस्तार वाढला आहे. त्यामुळे शहरातील पायाभूत सुविधा मजबूत केल्या जात आहेत. पुणे शहरात मेट्रो सुरु होण्यापूर्वी सार्वजनिक वाहतुकीसाठी केवळ पीएमपीएमएलची बस हाच पर्याय होता. ऑगस्ट महिन्यात वनाज ते रूबी हॉल आणि पिंपरी-चिंचवडमधील फुगेवाडी ते शिवाजीनगर हे मेट्रोचे दोन मार्ग सुरु झाले. त्यानंतर पुणे शहरातील नागरिकांनी मेट्रोला भरभरुन प्रतिसाद दिला. यामुळे मेट्रोचा विस्तार केला जात आहे. आता पुणे मेट्रो महाग झाल्याची बातमी आली आहे.

    पुणे मेट्रो तब्बल 2000 कोटींनी महाग झाली आहे. पुणे मेट्रोचा खर्च 11 हजार 400 कोटींवरून आता 13 हजार कोटींवर रुपयांवर गेला आहे. कोरोनामुळे मेट्रोच्या कामाला विलंब झाला होता. तसेच मेट्रोच्या जागेत करण्यात आलेला बदल, त्यामुळे भूसंपादनासाठी लागलेली जास्त रक्कम यामुळे मेट्रोचा खर्च सुमारे दोन हजार कोटी रुपयांनी वाढला आहे. मेट्रोच्या या वाढलेल्या खर्चाला मंजुरी मिळविण्याची प्रक्रिया आता सुरु करावी लागली आहे. परराष्ट्र राज्यमंत्री व्ही.मुरलीधरन यांनी एका बैठकीत ही माहिती दिली.

 

    


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती