To Reach The People & Community!
 दिनविशेष

 क्राईम विभाग

व्यावसायिकाच्या घरातून तब्बल 90 लाख लुबाडणाऱ्याला अटक

THE XYE   17-10-2023 14:40:48   72

व्यावसायिकाच्या घरातून तब्बल 90 लाख लुबाडणाऱ्याला अटक 

 

मुंबई. दि.१७. ( प्रतिनिधी ) : शहरात सर्वत्रच गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. या वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे नागरिक घाबरले आहेत. पोलिसांनी कठोर बंदोबस्त ठेवूनही अनेक गुन्हे वारंवार घडत असल्याने  नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

 

     गुन्हे हे नेहमीच बाहेरचे लोक करतात असं नाही काहीवेळ घरातील, विश्वासू व्यक्तीही एखाद्या लोभाने असं कृत्य करते ज्यामुळे मोठं नुकसान सहन करावं लागू शकतं.

     ज्या घराने आपल्याला आसरा दिला, हाताला काम आणि उदरनिर्वाहासाठी पैसा दिला, ज्या घरचं मीठ खाल्लं त्यांच्याच घरात त्यांना फसवून लाखो रुपये लुबाडल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. बिझनेसमनच्या घरातून चक्क 90 लाखांचा माल चोरल्याप्रकरणी दादर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. विद्यानंद उपेंद्र पासवान उर्फ ​​वीरेंद्र असे त्याचे नाव असून तो त्यांच्याकडे मदतनीस म्हणून काम करत होता.

     मिळालेल्या माहितीनुसार, जितेन मिस्त्री हे व्यावसायिक दादर येथे राहतात. 12 ऑक्टोबर रोजी त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत घरातील नोकराने पैसे चोरल्याची फिर्याद दिली होती. दुसऱ्या दिवशी पहाटे एकच्या सुमारास आरोपी वीरेंद्र याला अटक करण्यात आली.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया जाहिराती