सखोल अभ्यासु इतिहासकार प्रा. नामदेवराव जाधव द एक्स स्टार्टअपसोबत कार्य करणार
पुणे : नुकतेच जगातील सर्वोच्च व्यासपीठ समजल्या जाणाऱ्या सर्वधर्म परिषदेसाठी प्रा. नामदेवराव जाधव शिकागो येथे भारताचे प्रतिनिधित्व करत आपल्या विचारांचा जगभरात पुन्हा प्रचार व प्रसार करून आले आहे . यांच्यासोबत एक्स स्टार्टअप चे फाऊंडर डायरेक्टर मिलिंद वैद्य व नितिन येलमार यांनी मीटिंग केली आहे. यावेळी त्यांनी “अत्यंत इनोवटिव्ह योग्य वेळी सुरू केलेला नवप्रकल्प आहे. आमच्या आयडिया व तुमच्या आयडिया इमर्ज करत सोबत काही प्रोजेक्ट साठी कार्य करुयात!’’ असे सांगत त्यांच्यासोबतच्या एका नव्या प्रवासाची सुरुवात केली आहे .
प्रा.नामदेवराव जाधव हे नेहमी आऊट ऑफ द बॉक्स विचार करणारे अभ्यासू इतिहासकार आहेत. आणि सतत नाविन्याचा ध्यास घेणारे द्रष्टा इतिहासकार आहेत. आपण अजुन महाराजांचे काय पैलू आहेत की जे अजुन समोर नाही आले याचे त्यांनी संशोधन सुरू केले. त्यासाठी फ्रेंच, डच पोर्तुगीज ब्रिटिश यांचे समकालीन पत्रव्यवहार,कागदपत्रे यांचा सखोल अभ्यास केला आणि मग त्यांनी जगासमोर सर्व प्रथम आणले ते शिवाजी द management गुरु हे पुस्तकं.आणि असा महाराजांच्या नियोजन कौशल्यावर पुस्तकं लिहिणारे ते जगातील पहिले तरुण इतिहासकार ठरले आहेत.
नेहमीच वेगळा विचार करणारे जाधव सर मात्र भविष्याचा वेध अचूक घेतात.महाराजांचे management,महाराजांचे अर्थशास्त्र,महाराजांचे इंजिनिअरिंग,महाराजांची उद्योजगता अश्या खूप महाराजांचे गुण त्यांनी जगासमोर आणले.महाराजांचा हा पैलू त्यांनी जगासमोर आणला.