To Reach The People & Community!
 दिनविशेष

 वर्ल्ड

फत्तेचंद जैन विद्यालयात प्रा.भूषण ओझर्डे यांचे शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षे संदर्भात मार्गदर्शन शिबिर उस्फुर्त प्रतिसादात संपन्न

Nitin Yelmar   04-02-2024 14:04:37   18238

पुणे : श्री फत्तेचंद जैन विद्यालयात शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षे संदर्भात इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. श्री जैन विद्या प्रसारक मंडळाचे ऑनररी जनरल सेक्रेटरी अ‍ॅड.राजेंद्र कुमार शंकर लालजी मुथा, सहाय्यक सेक्रेटरी प्रा.अनिलकुमारजी कांकरिया यांनी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेच्या शुभेच्छा दिल्या. विद्यालयाच्या प्राचार्या सौ.एस.एस. नवले यांनी पाहुण्यांचे स्वागत व सत्कार केला व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.

यावेळी उपमुख्याध्यापिका सौ. एम. एम. जैन ,पर्यवेक्षक एस. एस.वाखारे, आर. एच. पितळीया, एम.एस. कलशेट्टी  तसेच शिक्षक प्रतिनिधी एन.आर.चव्हाण, एस.आर.चोरडिया व आठवीच्या शिष्यवृत्ती प्रमुख सौ. गोरडे या सर्वांनीही  विद्यार्थ्यांना परीक्षेच्या शुभेच्छा दिल्या.

प्रा.भूषण शिवलिंग ओझर्डे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले परीक्षेला जाता जाता करावयाची तयारी ,वेळेचे नियोजन करून प्रश्नपत्रिका सोडविणे, विविध क्लुप्त्या, सूत्रे वापरने, वेळेत उदाहरणे सोडविणे ,परीक्षा काळातील आरोग्य सांभाळणे अशा विविध विषयासंदर्भात उत्तम मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांशी संवाद साधून विद्यार्थ्यांच्या शंकांचेही निरसन केले.

करिअर गायडन्स ची महाराष्ट्रभर 400 पेक्षा जास्त व्याख्याने प्रा. भूषण ओझर्डे यांनी विना मोबदला दिली आहेत. अगदी डी वाय पाटील पासून सिंहगड कॉलेज पर्यंत सर्व मोठ्या महाविद्यालयात, लातूर पासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मुलांना करियर संदर्भात मोफत मार्गदर्शन त्यांनी केले आहे. मावळाची जिल्हा परिषद च्या शाळा, कामशेतचे  पंडित नेहरू विद्यालय, रामकृष्ण मोरे कॉलेज, प्रतिभा कॉलेज पासून अनेक ठिकाणी व्याख्याने त्यांनी  दिली आहेत. साध्या शाळेतील विद्यार्थ्यांना आणि पालकांना, अनेक शिक्षकांनाही यासंदर्भात माहितीची खूप कमतरता आढळते त्या ठिकाणी प्रा. भूषण ओझर्डे आवर्जून उपस्थित राहत असतात. त्यांच्या ओझर्डे इन्स्टिट्यूट चे 700 पेक्षा जास्त विद्यार्थी हे अधिकारी म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सिलेक्ट झाले आहेत.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. एस. ए. सोनवणे यांनी केले व आभार पर्यवेक्षक आर. एच.पितळीया यांनी मानले.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया जाहिराती