To Reach The People & Community!
 दिनविशेष

 रिजनल

पदपथावरील गर्दी कमी करण्यासाठी पुणे मनपाकडून मोठी कारवाई

THE XYE   21-10-2023 18:06:07   388

पदपथावरील गर्दी कमी करण्यासाठी पुणे मनपाकडून  मोठी कारवाई

 

पुणे. दि.२१. ( प्रतिनिधी ): पुणे शहरातील रस्त्यांची अवस्था, पदपथावर झालेली अनधिकृत खाद्यपदार्थांच्या गाड्यांची अन् रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यांवरुन मुंबई उच्च न्यायालयाने मनपाला चांगलेच फटकारले होते. त्यानंतर पुणे मनपाने रस्त्यांचे सुशोभीकरण करण्याची मोहीम सुरु केली.

     त्यासाठी शहरातील 15 रस्त्यांना व्हिआयपी रस्त्यांचा दर्जा दिला. हे रस्ते चांगली आणि सुशोभित करण्याचे काम मनपाने सुरु केले आहे. त्यासाठी या रस्त्यांवर असलेली अतिक्रमणे काढण्याचे काम सुरु केले आहे. अतिक्रमण काढण्यास होत असलेला विरोधामुळे शुक्रवारी रात्री मनपाने अतिक्रमण मोहीम हाती घेतली. या मोहिमेमुळे महत्वाचा असणारा हा रस्ता मोकळा झाला.

अनेक अवैध बांधकामांवर हातोडा

     पुणे महानगरपालिकेने 20 अधिकाऱ्यांची टीम तयार केली. ही टीम शहरातील अवैध बांधकाम आणि अतिक्रमण असलेल्या ठिकाणीही कारवाई करणार आहे. शुक्रवारी रात्री मनपा उपायुक्त विकास ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली टीम मुंढवा चौक येथे पोहचली. मनपाचे बुलडोझर, अतिक्रमण काढणारे कामगार आणि इतर जणांचे पथक पोहचताच कारवाई सुरु केली. रस्त्याला अडसर ठरणारे अतिक्रमण आणि अवैध बांधकाम तोडण्यात आले. रात्रीतून मुंढवा चौक अतिक्रमणमुक्त करण्यात आला. यावेळी पोलिसांचा बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.

     पुणे मनपाने शहरातील पंधरा रस्त्यांवर लक्ष केंद्रीत केले आहे. शहरातील या महत्वाच्या रस्त्यांना व्हीआयपी रोड नाव दिले आहे. हे रस्ते वेळोवेळी दुरुस्त करण्यात येणार आहे. या रस्त्याच्या सौदर्यंकरणावर भर देण्यात येणार आहे. व्हिआयपी रस्ते निवडताना काही निकष मनपाने लावले आहे. हे रस्ते शहरातील प्रमुख रस्ते असणार आहेत. या रस्त्यांजवळ विमानतळ, रेल्वे स्टेशन असणार आहे.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती